JOGESHWARI.ORG
INITIATIVE OF PRABODHAK YOUTH FEDERATION

या, जोगेश्वरीकरांनो एकत्र येऊया!
जोगेश्वरी.ऑर्ग
जोगेश्वरी.ऑर्ग हा जोगेश्वरीकारांनी जोगेश्वरीकरांसाठी सुरु केलेला उपक्रम आहे. जोगेश्वरीकारांनी एकत्र यावे, ते काय काय करत आहेत याची ओळख सर्वांना व्हावी, त्यातून सर्वांचाच फायदा व्हावा हा साधा प्रयत्न आहे.
यातून काय होईल? एकमेकांशी ओळख होईल, एकमेकांकडे कामे होतील, कामे देता येतील, त्यातून उद्योग, कला वाढेल, उत्सवांना एकत्र येता येईल, सण अधिक चांगल्याप्रकारे साजरे करता येतील, सांस्कृतिक कार्यक्रम करता येतील, जोगेश्वरीतील तरुणांच्या कला गुणांना वाव मिळेल.
विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन घेता येईल, नोकरीस उत्सुक असलेल्यांना नोकऱ्यांपर्यंत पोहोचता येईल, नोकऱ्या देणाऱ्यांना चांगले कॅन्डीडेट मिळतील, उद्योग इच्छुकांना आपला उद्योग पसरवता येईल, आपल्या आजूबाजूला कोण काय उद्योग करते आहे याची माहिती मिळेल, त्यातून उद्योग वाढेल. सध्या डिजिटल असलेला हा उपक्रम ग्राउंड लेव्हल वर सुद्धा येईलच! आपण कार्यक्रम करू, उपक्रम घेऊ, शिबिरे, चर्चासत्र, मेळावा, कार्यशाळा, स्पर्धा घेऊ.
चला एकत्र येऊया!

नोंदणी करा!
आम्ही तुम्हाला विनंती करतो की
तुम्ही स्वतःला जोगेश्वरी.ऑर्ग सोबत जोडून घ्या!